Follow us

Home » राज्य » झाडानी येथील देशभर गाजणारी जमीन कोणाची 

झाडानी येथील देशभर गाजणारी जमीन कोणाची 

झाडांनी येथील देशभर गाजणारी जमीन कोणाची

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का

माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले आणि त्यामुळे सध्या अहमदाबाद (गुजरात) येथे जीएसटी उपमुख्य आयुक्तपदी कार्यरत असलेले चंद्रकांत वळवी यांचे कांदाटी खोऱ्यातील तब्बल 640 एकर जमीन खरेदीचे वादग्रस्त प्रकरण देश भर चर्चेत आहे. राज्यभरात चर्चेत आलेले हे चंद्रकांत वळवी मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथील रहिवासी असल्याने सध्या नंदुरबार मध्ये देखील या प्रकरणाची  चालू आहे.

माहिती कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, जीएसटी उपमुख्य आयुक्त चंद्रकांत वळवी, त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक अशा एकूण 13 जणांनी सातारा जिल्ह्यातल्या सर्वात अतिदुर्गम व पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या कांदाटी खोऱ्यात झाडाणी (ता. महाबळेश्वर) हे संपूर्ण गाव खरेदी केले आहे. पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986, वन (संरक्षण) अधिनियम, 1976 व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 सारख्या अनेक महत्त्वपूर्ण कायद्यांचे राजरोसपणे नियमित उल्लंघन होत आहे; हा मोरे यांनी आरोप केला आहे. सुशांत मोरे असंही सांगतात की, झाडाणी येथील संबंधित भूखंडमाफिया हा गुजरात येथील एका मातब्बर नेत्याचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. त्या नेत्याच्या आशीर्वादानेच येथे एवढे मोठे अनधिकृत रिसॉर्ट बांधकाम होत आहे. दरम्यान रेणुसे ते झाडाणीवरून उचाट ते रघुवीर घाट हा दोन पदरी रस्ता देखील होत आहे. या रस्त्याची आवश्यकता नसतानाही हा रस्ता केला जात आहे. यासाठी रेणुसे गावात डांबर प्लांट सुद्धा अनधिकृतपणे सुरू आहे. मात्र, या कांदाटी- नंदुरबार- गुजरात कनेक्शनचे नेमके गौडबंगाल काय? हे अद्याप गुलदस्त्यात असल्याचे मोरे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी झाडाणीप्रकरणी अहवाल सादर केला असून त्यामध्ये नेमकं काय आहे, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

चंद्रकांत वळवी यांच्या परिवारातील काही सदस्यांचे म्हणणे आहे की, चंद्रकांत वळवी यांनी ही शेकडो एकर जमीनीची खरेदी आताच एका दमात केली, असे घडलेले नाही. पंधरा-सोळा वर्षांपूर्वी त्यांनी झाडणी गावात जमीन घ्यायला सुरुवात केली होती. टप्प्याटप्प्याने थोडी थोडी करून स्वतः वळवी आणि त्यांच्या नात्यातील लोकांनी काही वर्षात ती खरेदी केली. मग आताच वाद उफाळण्याचे कारण काय? . त्यातीलच शेकडो एकर जमीन वळवी यांनी खरेदी केली असून कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, तथापि त्या भागात दुतर्फी रस्ता निर्मिती करणारा ठेकेदार आणि स्थानिक रहिवासी यांच्यात वाद झाला आणि त्या वादाला हे निराळे वळण मिळाले, असा दावा वळवी परिवारातील सदस्यांकडून केला जात आहे. असे असले तरी पुण्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर झालेला अहवाल नेमकं काय सांगतो यावर पुढील सर्व कारवाई अवलंबून राहील असे दिसते आणि त्यामुळेच त्या अहवालात लपले काय? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रात लागून राहिली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket