कराड दक्षिणचं ठरलय वारं फिरलय लोकांना आता हवं नेतृत्व नवं डॉक्टर अतुल भोसले यांनी कोट्यावधी विकास कामांचा रचला डोंगर
सातारा (अली मुजावर)- सदैव जनतेच्या सेवेत असणाऱ्या युवा नेतृत्व डॉक्टर अतुल भोसले यांनी भाजपाच्या माध्यमातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे.गेली साडेचार वर्ष कराड तालुक्यातील प्रलंबित असणारे प्रश्न सोडविण्यासाठी युवा नेतृत्व डॉक्टर अतुल भोसले यांनी प्रयत्न केले आहेत. आपल्या अनुभवाचा ज्ञानाचा फायदा कराड दक्षिणेतील जनतेचे प्रश्न रस्ता वीज पाणी महिला व तरुणांच्या समस्या बेरोजगारी याकडे लक्ष देऊन त्या सोडवण्यासाठी डॉक्टर अतुल भोसले यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
कराड तालुक्याच्या विकास कामात मताचे राजकारण न करता विकास कामाला नेहमीच प्राधान्य देऊन डॉक्टर अतुल भोसले यांनी तळागाळातील माणसापर्यत भारतीय जनता पक्षाचे विचार पोहचव ले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आघाडी मिळवून देण्यात डॉक्टर अतुल भोसले यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर अतुल भोसले आमदार होतील हे कार्यकर्त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
कराड दक्षिण मधील जनतेचा आशीर्वाद डॉक्टर अतुल भोसले यांना लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाला असल्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अतुल भोसले यांचे पारडे जड असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
कोणतेही मोठे राजकीय पद नसताना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून मोठ्या प्रमाणात भाजपच्या माध्यमातून विकास कामांचा डोंगर डॉक्टर अतुल भोसले यांनी उभा केल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण कुणाबर आहे यापेक्षा जनता ही डॉक्टर अतुल भोसले यांच्याबरोबर असल्याचे दिसून येत आहे.
सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉक्टर अतुल भोसले यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.विकास काय असतो हे डॉक्टर अतुल भोसले यांनी सातत्याने आपल्या कार्यशैलीतून दाखवून दिले आहे.
त्यामुळेच विरोधकांना आत्तापासूनच पराभवाची धडकी भरली आहे. सत्तेत असूनही विरोधकांना एवढा मोठ्या प्रमाणात निधी मिळाला नसल्याचे दिसून येते.बेरोजगारांच्या हाताला काम!शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या घामाला दाम यासाठी डॉक्टर अतुल भोसले विशेष प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.
कराड शहर व तालुक्यातील क्रीडा प्रेमींसाठी डॉक्टर अतुल भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम च्या विकासासाठी 96 कोटीहून अधिक निधी मंजूर करून आणला आहे. कराड दक्षिण मधील अनेक रस्ते पूल यासाठी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पातून पंचवीस कोटीहून अधिक निधी आणला आहे. कराड दक्षिण मधील पानंद रस्त्यासाठी डॉक्टर अतुल भोसले यांनी 50 कोटीहून निधी मंजूर करून आणला.अनेक कोठ्यावधीची विकास कामे कराड दक्षिण मतदार संघात येणार असून निश्चितच येणाऱ्या काळात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये युवा नेतृत्व अतुल भोसलेंचा दबदबा असणार आहे.