Follow us

Home » ठळक बातम्या » सांस्कृतिक कला संस्कारातून विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळते.डॉ. प्रियाताई महेश शिंदे

सांस्कृतिक कला संस्कारातून विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळते.डॉ. प्रियाताई महेश शिंदे

सांस्कृतिक कला संस्कारातून विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळते.डॉ. प्रियाताई महेश शिंदे

गौरीशंकर इन्स्टिट्यूट लिंबचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न .     

लिंब: सांस्कृतिक कला संस्कारातून विद्यार्थ्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने नवी दिशा प्राप्त होते असे मत डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांनी व्यक्त केले ते सातारा महासैनिक भवन येथे गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयाचे आमोद 2024 वार्षिक स्नेहसंमेलनच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

यावेळी संस्थेचे संचालक डॉ.अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर ,प्राचार्य डॉ. अजित कुलकर्णी, देगाव फार्मसीचे प्राचार्य डॉ. नागेश अलूरकर, लिंबचे उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव ,डॉ. संतोष बेल्हेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.माधुरी मोहिते ,जनरल सेक्रेटरी सिद्धार्थ काळे, सांस्कृतिक विद्यार्थी प्रतिनिधी हर्षद वाडकर, प्रमिला कोकाटे आदी प्रमुख उपस्थित होते.

डॉ. प्रियाताई महेश शिंदे पुढे म्हणाल्या की, औषध निर्माण क्षेत्रातील ज्ञान कौशल्य विकसित करताना समाजाला पूरक नाविन्यपूर्ण संशोधनाचा ध्यास ही विद्यार्थ्यांनी घ्यावा. ज्ञान कला क्रीडा संस्कार संस्कृतीची जीवनात कास धरून विद्यार्थ्यांनी आपले करिअर उज्वल घडवावे.

गौरीशंकर चे संचालक डॉ.अनिरुद्ध जगताप म्हणाले की ,शैक्षणिक क्षेत्राइतकेच कला संस्कृतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी करिअर करताना स्वतःची स्वतंत्र ओळख समाजात निर्माण करावी. यावेळी कला, क्रीडा व अविष्कार स्पर्धातील विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र रोख रक्कम स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच औषध निर्माण शास्त्र शाखेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाविन्यपूर्ण संशोधन करून पेंटट प्राप्त करणारे प्राचार्य डॉ. अजित कुलकर्णी व डॉ.धैर्यशील घाडगे तसेच पी.एचडी पदवी प्राप्त डॉ. स्फूर्ती साखरे अविष्कार संशोधन स्पर्धात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रा. नीलम पवार यांचा उचित सन्मान व सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयाच्या वार्षिक नियतकालिका व न्यूज लेटरचे प्रकाशन समारंभ डॉ. प्रियाताई महेश शिंदे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सोलो डान्स, ग्रुप डान्स ,कॉकटेल डान्स, फॅशन शो, नाट्य व एकांकिका गायन आदी सांस्कृतिक कार्यक्रमातून कला अविष्काराचे सादरीकरण करून रसिक मनाची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मुस्कान इनामदार व दिव्या वेळेकर हिने केले आभार प्रा. माधुरी मोहिते यांनी मानले.

सातारा जिल्ह्यातील नवतरुणाई मधील कलागुणांना हक्काचे कलादालन उपलब्ध करण्याचा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कोरेगाव खटाव चे आमदार महेश शिंदे यांचा मानस असून त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. नजीकच्या काळात सर्व सोयींनी युक्त कलादालन नवतरुणाईला उपलब्ध होईल असा विश्वास डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांनी व्यक्त केला.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket