Follow us

Home » ठळक बातम्या » राशींभविष्य » आजचे राशिभविष्य 1 सप्टेंबर 2024

आजचे राशिभविष्य 1 सप्टेंबर 2024

दैनंदिन राशिभविष्य    

मेष : तुमची मानसिकता आज सकारात्मक असणार आहे. तुम्हाला तुमच्या विचारांची योग्य दिशा सापडणार आहे. मनोबलाच्या जोरावर अनेक कामात सुयश मिळवाल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे.

वृषभ : मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज तुम्ही तुमच्या नातेवाईकांना भेटायला जाणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. काहीजण एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देणार आहेत. 

मिथुन : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांबरोबर आजचा दिवस तुम्ही आनंदाने व्यतीत करणार आहात. काहींना आज अचानक धनलाभ होणार आहेत. मनोबल वाढणार आहे.

कर्क : आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. घरातील व घर गृहस्थिच्या कामांना प्राधान्य देणार आहात. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील.

सिंह : आज आपला मनोरंजन व करमणुकीकडे कल राहणार आहे. काहीजण धार्मिक कामात रममाण होणार आहेत. मानसिकता नकारात्मक राहील. अकारण होणारे वादविवाद टाळावेत. प्रवास आज नकोत. 

कन्या : आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. प्रवास सुखकर होतील. जुने मित्रमैत्रिणींच्या समवेत जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकणार आहात. काहींचे वैचारिक व बौद्धिक परिवर्तन होईल.

तुला : दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. आज तुम्ही आपल्या घरातील कामांना व घरातील व्यक्तींना प्राधान्य देणार आहात. प्रवासाचे योग येणार आहेत मनोबल वाढणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. 

 वृश्चिक : नातेवाईकांच्या गाठीभेटी घेणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. मानसिक सकारात्मकतेमुळे आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. 

धनु : मनोबल कमी राहील. आज आपल्यावर कोणतेतरी भावनिक दडपण राहील. एखादी चिंता अकारण त्रास देईल. काहींना एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

मकर : आज तुम्ही उत्साही व आनंदी रहाणार आहात. वैवाहिक जीवनात तुम्हाला सुसंवाद साधता येणार आहे. प्रवासाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. मनोबल वाढेल. 

कुंभ : खर्च वाढणार आहेत. अकारण एखाद्या गोष्टीत तुमचा वेळ वाया जाईल. प्रवास शक्यतो आज नकोत. वाहने चालविताना काळजी घ्यावी. आज कोणतेही धाडस नको. मनोबल कमी असणार आहे. 

मीन : आज तुम्ही तुमच्या मुलामुलींकरिता वेळ देऊ शकणार आहात. प्रवास सुखकर होतील. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी पडतील. आनंदी राहणार आहात. काहींना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.                                                                  

आज रविवार, आज दुपारी ४.३० ते ६ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket