हजारमाची येथील माध्यमिक विद्यालयात भित्तीपत्रकाचे अनावरण
तांबवे :- सदाशिवगड हजारमाची येथील यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी आकांक्षा व्हावळ, सिद्धेश्वरी पवार, हर्षदा पवार, सुबहाना तांबोळी यांनी संस्थेचे संस्थापक सचिव स्वर्गीय ए. व्ही. पाटील (अण्णा) यांच्या जीवनावर आधारित तयार केलेली भित्तीपत्रकांचे उदघाटन संस्थेचे सचिव डी. ए. पाटील यांचे हस्ते करणेत आले. या वेळी मुख्याध्यापक जी.बी. देशमाने,एस डी वेताळ,टी आर राजमाने,एस पी गोसावी, एम बी पानवळ,ए.ए.पाटील,एस डी.शिणंगारे,एस एम पोळ, एस जे देसाई,आर एम अपिने यांची उपस्थित होती.
संस्थेचे सचिव डी पाटील म्हणाले विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शाळास्तरावर सहशालेय उपक्रम राबविले जातात.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी अष्टपैलू गुण असतात.यावेळी महिला दिनानिमित्त सर्व महिला शिक्षिकांचा सत्कार करणेत आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत गजानन देशमाने यांनी व सूत्रसंचालन राजु अपिने यांनी केले व आभार सुरेश वेताळ यांनी मानले.