“रस्ता सुरक्षा साध्य करण्याची आकांक्षा समाजामध्ये निर्माण करा” विनोद चव्हाण
रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोप प्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते ते पुढे म्हणाले की, रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सर्वांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला असुन त्या दरम्यान आपण नियमांची माहिती व उजळणी केली आहे. आपण आपल्या सोबत इतरांचीही सुरक्षितता साध्य केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. आपल्या संकृतीचा महत्वाचा गुणधर्म म्हणून इतरांप्रती आदर याचा उल्लेख केला जातो. त्याप्रमाणे रस्ता वापर करताना इतर वाहन धारकांचा आदर करा जेणेकरुन सुरक्षितता साध्य होईल. आपण सुरक्षित राहिलो तरच व्यक्तीचे व्यक्तीमत्व विकास होऊन समाजाचा विकास होणार आहे. सामाजिक सुरक्षितता राखण्यासाठी रस्ता सुरक्षेबाबत समाजामध्ये आकांक्षा निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. प्रत्येकाने आपण, स्वतः, कुटुंब व आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्वांपासून रस्ता सुरक्षा साध्य करण्यासाठी नियमांचे पालन करण्याबाबत सुरुवात करुन शिस्तीचे व वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमासाठी श्री. संदीप म्हेत्रे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना, सातारा प्रतिनिधी, वाहन वितरक प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. सतिश शिवणकर, वरिष्ठ सहायक यांनी कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचे रस्ता सुरक्षा अभियांतर्गत योगदान याबाबत मनोगत व्यक्त केले. वाहन चालकांनी रस्ता सुरक्षेविषयी सर्व नियमांचे उदा. हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करणे, सीटबेल्टचा वापर करणे, तसेच अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करा असे आवाहन केले.
रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान-2024 विविध उपक्रमांमध्ये उत्स्फुर्त सहभाग घेऊन अमुल्य योगदान दिल्याबद्दल आणि रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी केल्याबद्दल श्री. अश्विनकुमार पोंदकुले, मो.वा.नि., श्री. रविंद्र चव्हाण, मो.वा.नि., श्री. गजानन गुरव, मो.वा.नि., श्री. दिग्विजय जाधव, मो.वा.नि., श्री. योगेश ओतारी, मो.वा.नि., श्रीमती स्वाती चव्हाण, मो.वा.नि. यांच्या सोबत काही सहायक मोटार वाहन निरीक्षक, काही कर्मचारी व इतर यांना “प्रशस्तिपत्रक” देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. संग्राम देवणे, सहा. मोटार वाहन निरीक्षक यांनी 15.01.2024 ते 14.02.2024 मध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्रीमती पूजा लोखंडे, सहा. मोटार वाहन निरीक्षक यांनी केले. आभार प्रदर्शन कार्य श्री. विशाल थोरात, सहा. मोटार वाहन निरीक्षक यांनी केले.