Follow us

Home » ठळक बातम्या » वाई वन विभागाची धडक कारवाई

वाई वन विभागाची धडक कारवाई

वाई – वनविभागाच्या प्रमुख असलेल्या सौ. स्नेहल मगर यांना खास खबऱ्या मार्फत विना परवाना खैराच्या झाडांची कत्तल करुन त्याची चारचाकी वाहनातून वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी सहकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन टाकलेल्या धाडीत ३ आरोपीनसह लाकडाने भरलेला मालट्रक असा तब्बल १० लाख अठ्ठावंन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने विना परवाना झाडे तोडणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

वाईच्या वनविभागाच्या प्रमुख स्नेहल मगर यांनी दिलेली माहिती अशी कि वाई तालुक्याचा पश्चिम भाग हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. येथील सह्याद्रीच्या डोंगर रांगान मध्ये जीवनावश्यक असलेल्या विविध जातींची आयुर्वेदीक औषधी वनस्पतींची मोठमोठी झाडे झुडपे आहेत त्याच बरोबर वन्यप्राणी देखील आहेत. या सर्वांच्या सौरक्षणाची जबाबदारी राज्य आणी केंद्र सरकारने निर्माण केलेल्या वनविभागावर सोपवली आहे. या विभागाच्या अधिकारी सौ. स्नेहल मगर आणी सहकारी कर्मचारी २४ तास अलर्ट असतात. दि. सदर गुन्हेकामी वनरक्षक वाई यांनी गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास चालु आहे. 

सदरची कारवाई मा. उपवनसंरक्षक सातारा अदिती भारद्वाज मॅडम, सहा. वनसंरक्षक सातारा महेश झांझुर्णे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल वाई सौ स्नेहल मगर मॅडम, वनपाल वाई एस. आर. मोरे, वनपाल वाशिवली एस. व्हि. लोखंडे, वनरक्षक वाई एस. एस. चौगुले, वनरक्षक जांभळी बी. बी. मराडे यांनी पार पाडली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket