Follow us

Home » ठळक बातम्या » मतदार जागृती चित्ररथ करणार मतदारांचे प्रबोधन: वाई विधानसभा क्षेत्रात अनोखा उपक्रम 

मतदार जागृती चित्ररथ करणार मतदारांचे प्रबोधन: वाई विधानसभा क्षेत्रात अनोखा उपक्रम 

मतदार जागृती चित्ररथ करणार मतदारांचे प्रबोधन:

वाई विधानसभा क्षेत्रात अनोखा उपक्रम 

महाबळेश्वर :जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या लोकसभा मतदानाची रणधुमाळी सुरू असताना अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी वाई विधानसभा क्षेत्रात प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव साहेब यांच्या प्रेरणेने तसेच महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील मॅडम, वाई तहसीलदार सोनाली मेटकरी मॅडम, खंडाळा तहसीलदार अजित पाटील सो यांच्या सहकार्याने तसेच वाई विधानसभा क्षेत्राचे स्वीप कार्यक्रम प्रमुख आनंद पळसे , गटशिक्षणाधिकारी महाबळेश्वर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाची सुरुवात आज प्रांताधिकारी कार्यालय वाई येथे अधिकारी , कर्मचारी व मतदारांच्या उपस्थितीत झाली.

         मतदार जागृती विषयक माहिती देणारा जनजागृती रथ तीनही तालुक्यांतील विविध गावांत जाणार असुन मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करणार आहे.यावेळी रथासोबत तीनही तालुक्यांतील शिक्षकांचे पथक राहणार असून पोवाडे, जनजागृती गीते, पथनाट्य याद्वारे उद्बोधनपर माहिती यावेळी ही पथके मतदारांपर्यंत पोहोचवणार आहेत.

      या मतदार जागृती रथांच्या उद्घाटन प्रसंगी महाबळेश्वर, वाई येथील शिक्षकांच्या पथकाने तसेच खंडाळा तालुक्यातील आसवली येथील बापूजी साळुंखे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर कार्यक्रम सादर केले.

     यावेळी नायब तहसिलदार वैभव पवार सो तसेच नायब तहसीलदार सोनावणे साहेब,वाईचे गटशिक्षणाधिकारी वाळेकर साहेब यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.मतदानाची टक्केवारी वाढावी व मतदारांना आपल्या हक्काविषयी जागृत करण्यासाठी वाई विधानसभा क्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket