Follow us

Home » राज्य » वन्य जीवांची तहान भागविण्यासाठी कृत्रिम पानवट्या मध्ये पाण्याची सोय गुरेघर वनपरिमंडल – वनविभाग महाबळेश्वर

वन्य जीवांची तहान भागविण्यासाठी कृत्रिम पानवट्या मध्ये पाण्याची सोय गुरेघर वनपरिमंडल – वनविभाग महाबळेश्वर

वन्य जीवांची तहान भागविण्यासाठी कृत्रिम पानवट्या मध्ये पाण्याची सोय गुरेघर वनपरिमंडल – वनविभाग महाबळेश्वर

पाचगणी -या वर्षातील उन्हाळ्याच्या मे हीटच्या चटक्यांनी वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने उन्हाळ्यात पाणी पातळी खोलवर गेली आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सातारा जिल्ह्यातील वन क्षेत्रांमध्ये असलेले नैसर्गिक पाणवठे देखील आता आटले आहेत.

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी वन विभागाचे महाबळेश्वर वनपरिक्षेत्र अंतर्गत गुरेघर वनपरिमंडळ विभागाचे अधिकारी सरसावले आहेत.

वनक्षेत्रातील पाणवठ्यांमध्ये पाणी नसले तर पाण्याच्या शोधात वन्य प्राणी शेतशिवारांमध्ये किंवा वस्त्यांमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ सध्या शेतशिवारांमध्ये पाणी कमी प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या संपर्कात येऊन गंभीर घटना घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे गुरेघर वन परिमंडल विभागाने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी उपलब्ध राहील याचे उत्कृष्टरित्या नियोजन केले आहे.

गुरेघर वन परिमंडलातील येणाऱ्या जंगलामध्ये कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी भरले जात आहे.

वन विभाग अधिकारी रणजीत काकडे म्हणाले की वन्य जीवांचे उन्हाळ्यात पाण्याअभावी हाल होऊ नये यासाठी पाणवट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. वनक्षेत्रामध्ये 26 पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून दिले जाते़. या कामी वैभव शिंदे वनरक्षक गुरेघर, तानाजी केळगणे वनरक्षक मेटगुताड, संजय भिलारे वनसेवक गुरेघर व इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चालू हंगामात कृत्रिम पानवटे तयार करून वन्य प्राण्यांच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी आदिती भारद्वाज उपवनसंरक्षक सातारा,महेश झांजुर्णे सहाय्यक उपवनसंरक्षक,महांगडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket