माजी आमदार मदन भोसले कुठे गेले तरी मला काहीच फरक पडणार नाही आमदार मकरंद पाटील
सातारा -(अली मुजावर )मदन भोसले हे माझे राजकीय विरोधकच आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात ते जरी गेले तरी मला काहीच फरक पड़त नाही माझी विचारधारा पक्की आहे.माझा पक्ष आणि चिन्ह देखील ठरल आहे. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ मी विकासाच्या जोरावर बांधला आहे. त्यामुळे भोसले कुठे गेले तरी मला काहीच फरक पडणार नाही असे स्पष्ट विधान आमदार मकरंद पाटील यानी कराड येते पत्रकारांशी बोलताना केले.
राष्ट्रवादी चे नेते जयंत पाटील यानी काही दिवसांपूर्वी माजी आमदार व भाजपा नेते मदन भोसले यांची भेट घेवून जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर मदन भोसले शरद पवार यांच्या पक्षात जाणार असे बोलले जावू लागले आहे त्या पार्श्वभूमिवर आ मकरंद पाटील यांनी वरील मोठे विधान केले.