Follow us

Home » राज्य » यशोदा इन्स्टिट्यूटच्या स्नातकोत्तर व्यवस्थापन विभागात नेतृत्व कौशल्यावर आधारित कार्यशाळा संपन्न

यशोदा इन्स्टिट्यूटच्या स्नातकोत्तर व्यवस्थापन विभागात नेतृत्व कौशल्यावर आधारित कार्यशाळा संपन्न

यशोदा इन्स्टिट्यूटच्या स्नातकोत्तर व्यवस्थापन विभागात नेतृत्व कौशल्यावर आधारित कार्यशाळा संपन्न

यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील एमबीए आणि एमसीए विभागात रोटरी क्लब ऑफ सातारा आणि रोटरी क्लब ऑफ कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने नेतृत्व कौशल्यावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली,

पदवीधर विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या कार्यशाळेमध्ये नेतृत्व कौशल्यावर आधारित अनमोल मार्गदर्शन मिळाले विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासावर भर देण्याची आणि नवी पिढी नेतृत्वसंपन्न घडवण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी व्यक्त केले.

अशा प्रकारचे उपक्रम या देशाचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी कार्यरत असणारा युवा वर्ग नेतृत्व कुशल बनविण्यासाठी मार्गदर्शक ठरतात असे मत यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांनी यावेळी व्यक्त केले.

दोन दिवस चाललेले या कार्य शाळेमध्ये परिपूर्ण व्यक्तीमत्व तलक बुद्धिमत्ता आणि सक्षम मन, मनाचे

व्यवस्थापन, माईंड मॅपिंग आणि लॅटरल विचारधारा, एनर्जी अवेअरनेस, इसेन्शियल लीडरशिप स्किल्स अशा विविध विषयांवर उपलब्ध असणाऱ्या मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन मार्गदर्शन केले. यामध्ये रोटरीयन उज्वल तावडे, सुमेधा भोसले, उर्मिला हैदणकर, नीलिमा निकम सत्यजित चितळे यांनी मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यशाळेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लबच्या वतीने गौरव चिन्ह देऊन

सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील अशा प्रकारच्या कार्यशाळा त्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे महत्त्व व्यक्त केले. यावेळी एमबीए विभाग प्रमुख, एमसीए विभागप्रमुख, तसेच यशोदा टेक्निकल कॅम्पस चे संचालक उपस्थित होते. डॉ. आर आर चव्हाण, विजय बाचुलकर, स्वप्निल वरदकर यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाचे कार्य पार पाडले. गायत्री देवी, रजत भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket