वाई-महाबळेश्वर-खंडाळ्यात हेल्थ टुरीझमच्या शक्यता आमदारांनी दवडल्या – विराज शिंदे
महाबळेश्वरात मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रीया शिबीर संपन्न
महाबळेश्वर, (प्रतिनिधी) – देशाचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आराम चौक, माकारिया हायस्कुल येथे विराजभैय्या शिंदे मित्र परिवार, वाई-खंडाळा-महाबळेश्वर, लोकविराज फौंडेशन आणि जीवनज्योती हेल्थकेअर फौंडेशन, पुणे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले. काँग्रसचे नेते विराज शिंदे आणि पंचायत समितीच्या मा. सदस्या ऋजुताताई विराज शिंदे यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले. मतदारसंघातील जनता निरोगी असावी. त्यांना आरोग्यदायी परिवेश मिळावा तसेच गरजू व्यक्तींना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी या शिबीरांचे आयोजन केले असे विराज शिंदे यांनी स्पष्ट केले.
या शिबिराचे उद्घाटनप्रसंगी विराज शिंदे म्हणाले की, “वाई-खंडाळा-महाबळेश्वर परिसरात गेल्या काही वर्षांत येथे सर्वोत्तम दर्जाच्या आरोग्यसुविधा उभा राहण्याच्या अनेक शक्यता उपलब्ध होत्या. पुणे-मुंबई या शहरांपासून आपल्या मतदारसंघाचे अंतर फारसे नाही. या परिसरात हेल्थ टुरीझमला प्रचंड वाव आहे. याठिकाणी जागतिक दर्जाच्या आरोग्यसुविधा देणाऱ्या संस्थांनी या भागात मल्टिस्पेशालिटी रुग्णालये उभी करावी. येथील हवाच एवढी स्वच्छ आणि शुद्ध आहे की, पेशंट निम्मा इथंच बरा होतो.” अशीही पुस्ती त्यांनी जोडली.
शिंदे पुढे म्हणाले की, “गेल्या पंधरा वर्षांमध्ये या भागात हेल्थ टुरीझम वाढण्याच्या अनेक शक्यता होत्या. पण नेतृत्वाची तशी मानसिकता नाही. साध्या ‘पीएचसी’मध्येही वेळेवर औषधे, डॉक्टर्स उपलब्ध नसतात अशी परिस्थिती असून आपल्याला ही स्थिती बदलायची आहे.एखादा आजार झाला तर त्यावर उपचार केले जातात. लोकशाहीत तुम्हाला दर पाच वर्षांनी अशी उपचार करण्याची संधी प्राप्त होते. आपल्या मतदारसंघाला झालेला व्हिटॅमिन व्ही ची कमतरता हा आजार आता दूर करण्याची गरज आहे. व्हिटॅमिट व्ही म्हणजे व्हिटॅमिन विकास पण विद्यमान आमदारांना व्हिटॅमिन एम ( मनी), व्हिटॅमिन पी ( पॉवर-सत्ता) याखेरीज दुसरं काही दिसत नाही.” अशी टिकाही त्यांनी याप्रसंगी केली.
या शिबिरात महाबळेश्वर तालुक्यातील असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदविला. या शिबिराला सातारा जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव, जिल्हा प्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)बंडूशेठ कुंभारदरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष (शरद पवार गट) सुभाष कांरडे, मा. कांग्रेस तालुका अध्यक्ष महाबळेश्वर किसनशेठ भिलारे, काँग्रेस सातारा जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, काँग्रेस तालुका अध्यक्ष महाबळेश्वर नंदूशेठ बावळेकर,कांग्रेस सरचिटणीस सातारा जिल्हा सलिमभाई बागवान,महाबळेश्वर झोपडपट्टी सुरक्षा दल तालुका अध्यक्ष ऋषिकेश वायदंडे, तालुका उपाध्यक्ष मोहम्मद नालबंद, महिला जिल्हाधक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), सौ. राजश्रीताई भिसे, शहर संघटक सौ. मालूसरे ताई, रियाजभाई तालुका अध्यक्ष महाबळेश्वर(सोशल मीडिया) शरद पवार गट, ओजेफ वाईकर,शहर प्रमुख शिवसेना महाबळेश्वर राजुभाऊ गुजर, ज्येष्ठ नेते (कांग्रेस) आप्पासो सांळुखे, बाबा नालबंद, संदीप शिंदे,अभिषेक शिंदे, त्याच बरोबर माता भगिनी, जेष्ठ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.