वाईत चाकुचा धाक दाखवुन एका परप्रांतीयाला लुटले अखेर डिबीने केले गजाआड
वाई प्रतिनिधी शुभम कोदे.वाई शहरातील गणपती मंदिर परिसरात चाकुचा धाक दाखवुन परप्रांतीय इसमाच्या खिशातील १० हजार रुपये जबरदस्तीने हिसकावुन घेणारा सराईत गुन्हेगार आरोपी हा फरार झाला होता .
वाईच्या डिबी विभागाच्या तपास पथकाने वाई शहरात विविध ठिकाणी सापळा लावुन रात्रभर छापे टाकुन आरोपीचा शोध घेत असतानाच वाई पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना त्यांच्या खास बातमीदारां मार्फत गोपनीय बातमी प्राप्त झाली की, वाई पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी हा गणपती घाटा जवळील गुरेबाजार झोपडपट्टी येथील सागर सुरेश जाधव राहणार गुरेबाजार झोपडपट्टी वाई येथील असुन तो सराईत गुन्हेगार आहे.
त्याने यातील फिर्यादी नामे आबिद साबीर अन्सारी राहणार बिहार सध्या रा बोपोर्डी ता. वाई जिल्हा सातारा यास चाकुचा धाक दाखवुन त्याच्या खिशातुन १० हजार रुपये रक्कम जबरदस्तीने काढुन घेतली आहे. सदर आरोपीवर यापुर्वी वाई पोलीस ठाणे येथे मालमत्ते विरुध्दचे तसेच शरिरा विरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.
त्यास ताब्यात घेण्याच्या सुचना वाईच्या डिबी विभागाच्या तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांना दिल्याने त्यास पथकाने ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच दोन
पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिशातुन रोख रक्कम १० हजार रुपये व चाकु जप्त करण्यात आला असुन त्यास सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समिर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शना खाली वाई पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे डिबी विभागाचे प्रमुख असलेले पोलिस उप-निरीक्षक सुधिर वाळुंज,डिबी विभागाचे पोलिस कर्मचारी श्रावण राठोड राम कोळी, प्रसाद दुदुस्कर, नितीन कदम, हेमंत शिंदे, धिरज नेवसे, गोरख दाभाडे विशाल शिंदे यांच्या पथकाने केली आहे. पोलीस अधिक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी वाईच्या डिबी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.