Follow us

Home » राज्य » वाई तालुक्यातील रेशनिंग दुकानदार हायटेक

वाई तालुक्यातील रेशनिंग दुकानदार हायटेक

 

वाई तालुक्यातील रेशनिंग दुकानदार हायटेक

वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)वाई तालुक्यातील रेशनिंग दुकानदार हायटेक अत्याधुनिक फोर जी मशीनचे वाटप वाई तहसील कार्यालयामध्ये संपन्न झाले. शिधापत्रिका धारकासाठी त्वरित धान्य मिळावे यासाठी शासनामार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी मा.सौ वैशाली राजमाने तसेच वाई तहसीलदार माननीय सौ. सोनाली मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली व हस्ते तसेच मा. सौ. वैशाली जायगुडे- घोरपडे, निवासी नायब तहसीलदार आणि मा. श्री. भाऊसाहेब जगदाळे, महसूल नायब तहसीलदार यांचे हस्ते वाई, पुरवठा शाखेचे अधिकारी श्री. अतुल मढेकर, श्री. राजेंद्र कांबळे व त्यांचे सर्व सहकारी यांच्या नियोजनातून वाई तालुक्यातील सर्व दुकानदारांना आज नविन 4G मशीनचे वाटप करण्यात आलेयावेळी वाई तालुका रास्त भाव दुकानदार संघटना अध्यक्ष माननीय अनिल मांढरे व उपाध्यक्ष मा. श्री. संजय जायगुडे व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वाई तालुक्यातील सर्व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे नवीन मशीन कसे वापरणे याचा डेमो व संपूर्ण सविस्तर माहिती माननीय श्री. नितिन गाडे साहेब व सहकारी सातारा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांनी प्रशासनास पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले या मशीनमुळे ग्राहकांचा वेळ व दुकानदारांचा त्रास कमी होणार असून नवीन पद्धतीच्या सर्व अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी या मशीन मध्ये आहेत त्यामुळे जिल्हा पुरवठा शाखेचे तसेच वाई पुरवठा शाखेचे व प्रशासनाचे तालुका संघटने कडून आभार माननेत आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket