Follow us

Home » राज्य » लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी मतदान केलेच पाहिजे-यशेंद्र क्षीरसागर

लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी मतदान केलेच पाहिजे-यशेंद्र क्षीरसागर

लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी मतदान केलेच पाहिजे!

                -यशेंद्र क्षीरसागर

सातारा, दिनांक 31: “लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आणि प्रगल्भतेसाठी सर्वांनी मतदान केलेच पाहिजे. ते आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, वक्ते, कोरेगाव पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले. येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्यु.कॉलेज येथे शासनाच्या ” स्वीप” अर्थात मतदार जनजागृती योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख निमंत्रित वक्ते म्हणून श्री.क्षीरसागर बोलत होते. विस्तार अधिकारी सौ.जयश्री गुरव,मुख्याध्यापक अमर वसावे , शिक्षक आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते.

क्रीडाशिक्षक यशवंत गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

‘मतदान जागृतीचे काम विद्यार्थ्यांमार्फत घरोघरी पोहोचणे गरजेचे आहे.आजचा विद्यार्थीसुद्धा लोकशाही प्रक्रियेतील मतदार जागृती मोहिमेतील एक महत्वाचा घटक आहे’, असे प्रतिपादन सौ. गुरव यांनी केले

श्री.क्षीरसागर यांनी “मतदान,लोकशाही,विद्यार्थी आणि समाज” या विषयावर मंथन केले.त्यांनी लोकशाही पद्धतीमधील मतदानाचे महत्व पटवून देताना काही मतदार मतदानाचा दिवस एक सुट्टीचा दिवस म्हणून घालवतात व नंतर निवडून आलेल्या उमेदवाराच्या कार्यपद्धतीवर आपली मत मतांतरे व्यक्त करतात. हे योग्य आहे का याचा मतदारांनी विचार केला पाहिजे.गेल्या लोकसभेच्या निवडणूकीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदान फक्त साठ टक्के झाले .तर संपूर्ण भारताची मतदानाची टक्केवारी सदुसष्ट टक्क्याच्या आसपास राहिली. ज्या मतदारांनी मतदानच केले नाही, त्यांनी लोकशाहीतील मतदान प्रक्रियेचा अपमान केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी “मतदान दिवस” एक उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे असेही त्यांनी प्रतिपादन केले.

लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग असणे गरजेचे आहे हे विशद करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक विचार विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या अभियानाची आठवण करुन देताना आपल्या संपूर्ण समाजाने लोकशाही पद्धतीने मतदान करुन लोकशाहीचा उत्सव साजरा केला पाहिजे हे अनेक उदाहरणांचे दाखले देत पटवून दिले..

सूत्रसंचालन सौ वृषाली कुंभार यांनी केले.आभार जेष्ठ शिक्षिका सॊ.ज्योती सातपुते यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket