Follow us

Home » राज्य » शिक्षण » यशोदा च्या लोकनेते सुबराव कदम जुनिअर कॉलेजची 100% निकालाची दैदिप्यमान परंपरा कायम

यशोदा च्या लोकनेते सुबराव कदम जुनिअर कॉलेजची 100% निकालाची दैदिप्यमान परंपरा कायम

यशोदा च्या लोकनेते सुबराव कदम जुनिअर कॉलेजची 100% निकालाची दैदिप्यमान परंपरा कायम

बारावीच्या विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांचा निकाल शंभर टक्के

श्रावणी जाधव (84.17%) समाधान झांझुरणे (83.50%) अनुराधा वाघ (82.67%)

सातारा :यशोदा शिक्षण संस्था साताऱ्याचे लोकनेते सुबराव कदम कनिष्ठ महाविद्यालय सातारा च्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तम गुणांसह यश प्राप्त केले. महाविद्यालयातील विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही विद्या शाखातील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तम गुण संपादन केले. विज्ञान विद्या शाखेचा निकाल 100 % इतका लागला असून, श्रावणी जाधव (84.17%) समाधान झांझुरणे (83.50%) अनुराधा वाघ (82.67%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.

महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखे चा निकाल 100% इतका लागला असून गायत्री सावंत, पुनम वाघचौदे, जाहिद शेख आणि क्षितिज भवर यांनी गुणांनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. तर कला शाखेतील धनश्री कांबळे, गजेंद्र बेनकर, सिद्धार्थ शेंडगे या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला.

यशोदा शिक्षण संस्थेच्या लोकनेते सुग्रह कदम जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सातारा या महाविद्यालयाचा 2024 चा बारावीचा निकाल 100 % इतका लागला आहे. 

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, कार्यकारी प्रा. संचालिका नम्रता सगरे आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि करिअरला वाव मिळवून देणारी शिक्षण संस्था म्हणून यशोदा शिक्षण संस्थेची ख्याती आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या टप्प्यातील या यशाबद्दल समाजातील वेगवेगळ्या घटकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

विद्यार्थ्यांनी नवनवीन व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये आपले कौशल्य दाखवावे आणि भविष्यातील प्रगतीपथावर वाटचाल करावी अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket