Follow us

Home » राज्य » शिक्षण » यशोदा च्या पॉलिटेक्निक ला एन बी ए चे मानांकन प्राप्त

यशोदा च्या पॉलिटेक्निक ला एन बी ए चे मानांकन प्राप्त

यशोदा च्या पॉलिटेक्निक ला एन बी ए चे मानांकन प्राप्त

आधुनिकतेचा ध्यास, दर्जात्मक आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण पद्धतीचे सातत्य सिद्ध

यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील कॉलेज ऑफ पॉलीटेक्निक ला नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन, नवी दिल्ली यांच्या समितीने नुकतीच भेट दिली होती. तीन दिवस प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर यशोदा कॉलेज ऑफ पॉलीटेक्निक ला आगामी तीन शैक्षणिक वर्षांकरिता एन बी ए ची मान्यता प्रदान करण्यात आली. यशोदा कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकच्या सिव्हिल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांना सदरचे मानांकन प्राप्त झाले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, कार्यकारी संचालिका सौ नम्रता सगरे यांनी विशेष कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

 

एमबीएची मान्यता ही शैक्षणिक गुणवत्तेची आणि सुधारण्याची हमी देणारी प्रक्रिया आहे. मान्यताप्राप्त संस्थेतील शैक्षणिक अभ्यासक्रमांचे अत्यंत गंभीरपणे मूल्यांकन करणारी एनबीए ही प्रणाली राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकनाचे महत्त्व विशद करते. मान्यतेचे निकष, प्रक्रिया, धोरणे आणि कार्यपद्धती ही नियमावलीनुसार आहे का तसेच परिणाम आधारित शिक्षण या गोष्टी प्रामुख्याने तपासणारी व्यवस्था म्हणजेच एनबीए मानांकन.

 

प्रथम प्रयत्नात एनबीए मान्यता मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या शैक्षणिक संस्थांपैकी यशोदा टेक्निकल कॅम्पस हे एक बनले आहे. यामुळे यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. यशोदा टेक्निकल कॅम्पस सारख्या अत्यंत सुसज्ज आणि दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये पॉलिटेक्निक, इंजीनियरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए एमसीए इत्यादी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

 

चालू शैक्षणिक वर्षापासून रोबोटिक्स, मेकेट्रोनिक्स, सायबर सिक्युरिटी, बीबीए बीसीए या नवीन विद्याशाखाना देखील प्रारंभ होत आहे. विद्यार्थ्यांना यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये देत असलेल्या विविध सोयी सुविधा लक्षात घेऊन नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन ने पॉलिटेक्निक महाविद्यालयास हे मानांकन बहाल केले आहे. यशोदा इन्स्टिट्यूटच्या सर्व विद्यालयांच्या गुणवत्तेचा स्तर आणि दर्जा यावरती एनबीएच्या मानांकनामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

यशोदा चे माजी विद्यार्थी हे देश विदेशात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत येथील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या खूप संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करण्यामध्ये महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे. पालकांच्या याच विश्वासाला सार्थ ठरण्याची किमया यशोदा इन्स्टिट्यूटने साकारली आहे.

 यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील तज्ञ आणि अनुभवी अध्यापक वर्ग, सुसज्ज आणि अद्ययावत प्रयोगशाळा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संदर्भ ग्रंथांनी परिपूर्ण असे ग्रंथालय, अत्यंत अध्यायावत असणारे संगणक कक्ष, सर्व सुविधांनी युक्त डिजिटल क्लास रूम्स, इंक्युबॅशन सेल, उद्योजकता विकास केंद्र, या आणि अशा विविध सोयी सुविधांमुळे या प्रकारचे यश मिळवणे शक्य झाले असल्याचे मत यशोदा कॉलेज ऑफ पॉलीटेक्निक चे प्राचार्य प्रवीण गावडे, यशोदा कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ. प्रवीण कुमार बडदापुरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशनच्या मानांकनासाठी अविरतपणे परिश्रम घेणाऱ्या विभाग प्रमुख तसेच शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी यशोदा टेक्निकल कॅम्पस चे संचालक डॉक्टर विवेक कुमार रेदासनी, सहसंचालक रणधीर सिंह मोहिते, कुलसचिव गणेश सुरवसे, प्राचार्य डॉ. विठ्ठल चावरे, विभाग प्रमुख प्रा. रणजीत बसुगडे, प्रा. प्रतीक मतकर, प्रा. भूपाळी कुंभार, प्रा. रणजीत खांडेकर तसेच इतर सर्व विभागांचे विभाग प्रमुख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket