Follow us

Home » राज्य » शिक्षण » यशोदा कॉलेज ऑफ पॉलीटेक्निकचे विद्यार्थी गुणवत्तेत सर्वोत्तम 

यशोदा कॉलेज ऑफ पॉलीटेक्निकचे विद्यार्थी गुणवत्तेत सर्वोत्तम 

यशोदा कॉलेज ऑफ पॉलीटेक्निकचे विद्यार्थी गुणवत्तेत सर्वोत्तम 

यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या कॉलेज ऑफ पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांनीमहाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये गुणवत्तेत चमकदार कामगिरी करत यश संपादन केले.

पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इत्यादी विद्याशाखांचे निकाल सर्वोत्तम लागले आहेत. पूजा दुधाने (83.16 %) ने सिविल इंजिनिअरिंग मधून, पांडुरंग कोंडिग्रे (81.44%) याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून, तर श्रेया सावंत (80.08%) ने मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून महाविद्यालयात प्रथम येण्याची किमया साकारले आहे.

 

यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये चालू शैक्षणिक वर्षासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमांना देखील प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. शासनमान्य अधिकृत सुविधा केंद्र यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये उपलब्ध आहे. चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निक प्रवेशा कडचा कल वाढलेला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यायचा असल्यास दिनांक 09 जुलै पर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया विषयी माहिती घेण्यासाठी सुविधा केंद्रामध्ये संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. 

यशोदा शिक्षण संस्थेतील विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आणि व्यवस्थापनाचा उत्तम शिक्षणासाठी चा कटाक्ष यामुळे हे यश मिळवणे शक्य झाल्याचे मत पॉलीटेक्निक कॉलेज चे प्राचार्य प्रवीणकुमार गावडे यांनी व्यक्त केले. पॉलिटेक्निक विभागाच्या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष दशरथ सगरे उपाध्यक्ष अजिंक्य सगरे, संचालक, सहसंचालक, कुलसचिव यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाचे अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket