यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची इंजीनियरिंग साठी पहिली पसंती
मेकेट्रोनिक्स, रोबोटिक्स, सायबर सिक्युरिटी या अद्ययावत अभ्यासक्रमांना सर्वाधिक मागणी
शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी व्यावसायिक आणि तंत्र शिक्षण अभ्यासक्रमांसाठी राज्यभरामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. चालू वर्षी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा कडून केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पार पडणार आहेत. इंजीनियरिंग, पॉलिटेक्निक, एमबीए, एमसीए यासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्रारंभ झाला आहे. प्रवेश प्रक्रियेची काही अभ्यासक्रमांची पहिली आणि दुसरी फेरी आता पूर्ण होत आहे. सुधा टेक्निकल कॅम्पसचे इंजिनिअरिंग महाविद्यालय हे सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी क्षमता असणारे महाविद्यालय असून प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीनंतर सातारा जिल्ह्यातील उच्चतम विद्यार्थी यांनी यशोदा टेक्निकल कॅम्पस ला प्रथम पसंती दिल्याचे दिसते आहे.
राज्यभरामधील लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेत असतात. चालू शैक्षणिक वर्षांमध्ये यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये इंजिनिअरिंगच्या नवनवीन अध्यायावत अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. इंजीनियरिंग मधील तब्बल नऊ विविध शाखांना यशोदा मध्ये प्रवेश घेण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आली आहे. मेकेट्रोनिक्स, रोबोटिक्स, सायबर सिक्युरिटी यासारख्या अद्यावत अभ्यासक्रमाने देखील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसत आहे.
बदलत्या परिस्थितीला अनुरूप असणारे नवनवीन अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्यामध्ये सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स, मेकेट्रोनिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, मशीन लर्निंग इत्यादी अत्याधुनिक असणारे अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत, आवश्यक असणारे प्रत्येक संसाधन करून देण्यावर सगरे सरांनी विशेष भर दिला. उच्चविद्याविभूषित अध्यापक वर्ग, प्रचंड मेहनतीतून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे ज्ञानार्जनाची कार्य अखंडपणे करताना दिसतात. संस्थेच्या स्थापनेच्या अगदी कमी कालावधी मध्ये राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून मानांकन प्राप्त झाले असल्यामुळे संस्थेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि त्यांना देण्यात येणाऱ्या दर्जेदार सुविधा यांची उपलब्धता अधोरेखित होते. सोबतच हे मानांकन म्हणजे व्यवस्थापनातील काटेकोरपणा आणि उच्चतम भौतिक सुविधा याचे प्रत्यंतर आहे. संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेणारा विद्यार्थी हा कुशल बनावा यासाठी स्वतंत्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल ची स्थापना करण्यात आली आहे.ज्याच्या माध्यमातून इथे प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे शिक्षण व कौशल्य विकासावर आधारित उपक्रम यामध्ये सहभागी होऊन शैक्षणिक टप्पा पूर्ण होताच विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची संधी सहजपणे उपलब्ध करून घेऊ शकतात.
यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील सर्वच अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची प्रथम पसंती मिळत असून इंजिनिअरिंग सह, पॉलीटेक्निक एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए, फार्मसी, आर्किटेक्चर या विद्याशाखाना देखील मोठ्या प्रमाणावर मागणी होताना दिसत आहे. विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश यासंदर्भातील इथंबूत माहितीसाठी सुविधा कक्षांना भेट द्यावी असे आवाहन यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वतीने करण्यात आले आहे.