Follow us

Home » राज्य » शिक्षण » यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या विद्यार्थ्यांची क्विक हिल सायबर शिक्षा व सुरक्षा अभियानात निवड

यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या विद्यार्थ्यांची क्विक हिल सायबर शिक्षा व सुरक्षा अभियानात निवड

यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या विद्यार्थ्यांची क्विक हिल सायबर शिक्षा व सुरक्षा अभियानात निवड

यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील संगणक शास्त्र विभागातील चार विद्यार्थ्यांची क्विक हिल फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. सदरच्या अभियानात काम करण्यासाठी क्लब ऑफिसर म्हणून किरण सानप, सत्याजीत जगताप, गणेश राणे, अनिकेत शिर्के या चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग व ओरिएंटेशन विमान नगर (पुणे) येथील क्विक हिल कंपनीच्या ऑफिसमध्ये नुकतेच पार पडले. या ट्रेनिंग सेशन दरम्यान विद्यार्थ्यांना प्रोग्राम समन्वयक अजय शिर्के, सुगंधा दाणी, गायत्री पवार यांनी मार्गदर्शन केले. क्विक हिलच्या चेअर पर्सन अनुपमा काटकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

सायबर सिक्युरिटी सारख्या अभ्यासक्रमांना मोठे महत्त्व

संगणकाच्या क्रांतीसोबतच सायबर गुन्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. याबाबतीत समाज मनामध्ये जनजागृती घडवून आणणे अत्यंत गरजेचे बनले आहे. त्या अनुषंगाने क्विक हिलच्या या अभिनव उपक्रमांमध्ये यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या विद्यार्थ्यांची झालेली निवड ही अत्यंत कौतुकास्पद आणि अभिनंदनिय आहे. विद्यार्थ्यांना समाजमनाच्या प्रबोधन कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. प्रा. अजिंक्य सगरे, उपाध्यक्ष: यशोदा इन्स्टिट्यूटस, सातारा

निवड झालेले विद्यार्थी पुढील काही दिवसांसाठी क्विक हिल फाउंडेशनच्या सायबर सिक्युरिटी च्या जनजागृती बद्दल विद्यार्थ्यांना व सामाजिक घटकांना मार्गदर्शन करून त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याचे काम करणार आहेत. तसेच प्रा. विकास चव्हlण यांची या अभियानासाठी शिक्षक समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. प्राचार्य डॉ. प्रवीणकुमार बडदापुरे या प्रकल्पाबद्दल सांगताना म्हणाले, “निवड झालेले विद्यार्थी हे आपल्या शैक्षणिक संकुलाच्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचे काम करणार आहेत, तसेच हे अभियान सक्षमपणे राबविण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, डायरेक्टर डॉ वि. के. रेदासानी, असोसिएट डायरेक्टर प्रा आर डी मोहिते, रजिस्ट्रार गणेश सूरवसे, संगणक विभागाच्या विभाग प्रमुख डॉ सरिता बलशेट्वर आदीनी अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket