‘यशोदाच्या’ साहिल इनामदार व करण गायकवाड चे राज्यस्तरीय मॉडेल एक्स्पो स्पर्धेमध्ये यश
विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी केलेली मैत्री राज्य निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी असणाऱ्या संशोधकाला शोधून, नवनिर्मितीचे कार्य करणे आवश्यक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. हा दिवस आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या कामगिरीबद्दल अभिमान बाळगण्याची संधी देतो.
राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मॉडेल एक्स्पो स्पर्धेमध्ये यशोदा शिक्षण संस्थेमधील बी फार्मसी डिपार्टमेंट च्या कु साहिल इनामदार (अंतिम वर्ष बी.फार्म) आणि कु. करन गायकवाड (द्वितीय वर्ष बी. फार्म) यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जिंकून यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या प्रात्यक्षिक शिक्षणाद्वारे अशा प्रकारचे यश संपादित करता येऊ शकते . विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक शिक्षणाद्वारे आपल्या कल्पक विचारांच्या आधारावरती संशोधनाची कास धरावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, प्राचार्य डॉ विवेककुमार रेदासांनी, प्रा.डॉ. अविनाश भागवत यांनी अभिनंदन केले. प्रा. डॉ.भरती चवरे यांनी मार्गदर्शन केले.