यशोदाच्या विद्यार्थ्यांनी समाजमनाच्या प्रबोधनासाठी कार्य करावे: प्रा. नितीन बानगुडे पाटील
यशोदा इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी राष्ट्र निर्माण निर्माण साठी कार्य करतीलः प्रा. नितीन बानगुडे पाटील
यशोत्सव 2024 युवा महोत्सव उत्साहात संपन्न, विविध मान्यवरांची उपस्थिती
यशोदा इन्स्टिट्यूट मधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच अनेक क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे. समाजासमोरील वाढती आव्हाने विचारात घेता विद्यार्थ्यांनी समाजमनाच्या प्रबोधनासाठी कार्य करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी येथे केले. यशोदा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी या कार्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि राष्ट्र निर्माणची जबाबदारी पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले. यशोदा इन्स्टिट्यूटच्या यशोत्सव 2024 या युवा महोत्सव कार्यक्रम ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे होते.
यावेळी सुधीर विसापुरे, अतुल माळी, संजय शेलार, संजय मोरे, संजय कदम, राजेंद्र साळुंखे, श्री वंजारी इत्यादी प्रमुख उपस्थित होते. यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये या युवा महोत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सकाळच्या सत्रात वार्षिक क्रीडा महोत्सव बक्षीस वितरण समारंभ पार पडला. त्यानंतर दुपारचे सत्रात प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते यशोत्सव 2024 या युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. सोबतच संशोधन कार्यातील योगदानाबद्दल शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्र निर्माण यासाठी कशा पद्धतीने कार्य करणे अपेक्षित आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभुराजे यांच्या मनामध्ये असणारा युवक कसा घडवता येईल हे पाहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अनेक समर्पक उदाहरणातून त्यांनी युवकांच्या मनाचे प्रबोधन तर केले तर त्यासोबतच युवकांच्या खांद्यावर असणारी जबाबदारी विशद केली. त्यांनी यशोदा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे संशोधन कार्यासाठी विशेष कौतुक केले.
यावेळी बोलताना प्रा. दशरथ सगरे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल प्रति असणारे ओढ कमी करण्याचे आणि अभ्यासातील प्रगती साधण्याचे आवाहन केले. युवा वर्गावरती मोठी जबाबदारी असल्याने त्यांनी सजग राहणे आवश्यक असल्याचे मत प्रा. दशरथ सगरे यांनी व्यक्त केले.
यावेळी यशोदा टेक्निकल कॅम्पस चे संचालक डॉ. विवेककुमार रेदासनी यांनी यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या कार्याचा आढावा घेत असताना वार्षिक अहवालाचे वाचन केले. प्रा. रणधीरसिंह मोहिते यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देताना नितीन बानुगडे पाटील यांच्या प्रबोधनपर व्याख्यानांची आणि लेखनाची उपस्थितांना माहिती करून दिली.
विद्यार्थ्यांनी अत्यंत नयनरम्य असे नृत्याविष्कार, गायन कला, आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित असणारे कलागुणांचे सादरीकरण केले. यावेळी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य डॉ. प्रवीणकुमार बडदापुरे, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर चे प्राचार्य आर्किटेक्ट सुहास तळेकर, कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. विठ्ठल
चावरे, कॉलेज ऑफ पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रवीण गावडे, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे कुलसचिव गणेश सुरवसे, विभागप्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ सुप्रिया भांडवलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सौ ज्योती पिंगळे यांनी केले.