यशवंत शिक्षण संस्थेत विद्यार्थी जडण घडण होते -सचिव डी.ए.पाटील
कराड प्रतिनिधी –आमचे यशवंत शिक्षण संस्थेमध्ये अध्यापन, गुणवत्ता बरोबर इतर विद्यार्थ्यांची ही जडणघडण होत असते असे प्रतिपादन संस्थेचे सचिव डी. ए. पाटील यांनी केले.
यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका संजना देसाई यांचे सेवानिवृत्ती कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी नगर सेवक हणमंत पवार,माजी.पंचायत समिती सदस्या रुपाली यादव, वसंतराव शिंदे,माजी उपसरपंच राजेंद्र थोरात, वडगांव सोसायटी चेअरमन सुहास जगताप,संपत शिंदे, जनार्दन देसाई,संजना देसाई, मुख्याध्यापक जी.बीदेशमाने,ए.आर.मोरे,व्ही,एच.कदम,डी.पी.पवार यांचीप्रमुख उपस्थिती होती.
सचिव डी ए पाटील म्हणाले स्वर्गीय ए.व्ही.पाटील अण्णा यांनी बहुजन वर्गातील शिक्षक घडविले त्यांचा वसा आणि वारसा जपला जात आहे.पाया भक्कम असेल तर इमारत चांगली उभा राहते. संजना देसाई या शिक्षिका स्पष्ट विचार मांडणारे आहेत त्यांनी अध्यापनाचे काम प्रामाणिकपणे केले आहे.तीस वर्षाच्या सेवेनंतर आज त्या सेवानिवृत्ती होत आहेत.
यावेळी एस डी वेताळ,एम.बी.पानवळ,ए.ए.जाधव,विजया कदम,गौरी जाधव, रुपाली यादव, हणमंत पवार,दिपक पवार, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सेवानिवृत्ती शिक्षिका संजना देसाई म्हणाल्या यशवंत शिक्षण संस्थेतील विविध शाळा मध्ये मी तीस वर्षे सेवा केली आहे .विविध विद्यार्थी घडविण्याचे काम केले आहे.या संस्थेचे संस्थापक सचिव अण्णांनी मला धाडसी,कणखर बनविले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन देशमाने यांनी स्वागत जनार्दन देसाई यांनी सुत्रसंचलन मनिषा पानवळ यांनी व आभार ए.ए.पाटील यांनी मानले.