मौजे पार येथिल आई रामवरदायिनी देवीच्या यात्रेस प्रारंभ.
पार्वतीपूर पार, ४ मे २०२४: समर्थ रामदास स्वामी यांनी प्रसिद्ध तुळजा भवानी हीच श्री आई रामवरदायिनी असे जिचे वर्णन केले आहे. अशा या श्री आई रामवरदायिनी मातेचे ऐतिहासिक किल्ले प्रतापगङाच्या पायथ्याशी मातेचे पुरातन मंदीर घनदाट जंगलांनी वेढलेल्या सह्याद्रीच्या कुशीत महाबळेश्वरच्या पश्चिमेला २० कि.मी अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणार्या ऐतिहासिक श्री क्षेत्र पार्वतीपूर पार येथे श्री आई रामवरदायिनी देवी यांचा वार्षिक यात्रोत्सव चैत्र कृष्ण द्वितीया, शके १९४६ रविवार दिनांक ५ मे २०२४ ते वैशाख शुद्ध षष्ठी सोमवार दिनांक १३ मे २०२४ या कालावधीत साजरा होणार आहे.
या यात्रोत्सवात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात रविवारी (५ मे) सकाळी आई श्री रामवरदायिनी मातेस तसेच देवदेवतांना अभिषेक(घाटमाथा)येथे आणि दुपारी सत्यनारायण महापूजा, सायंकाळी पालखी मिरवणूक आणि रात्री सासन काठी उभारणीचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (६ मे) कुमठे गावची ग्रामदेवता श्री झोळाई माता आणि शिरवली गावचे ग्रामदैवत श्री जननी कुंभळजाई यांचे आगमन होणार आहे. याच दिवशी रात्री ४३ गावातील देवांचे विंङे वर्तविण्याचा महत्वाचा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवारी (७ मे) सकाळी ९ ते १२वा.श्रींची महापुजा ,रात्री ९ ते ११वा.विविध गावातील देवदेवतांचे आगमन तसेच बगाङ कार्यक्रम रात्री ११ ते १२ या कालावधीत संपन्न होणार आहे. यानंतर मनोरंजनपर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार (८ मे) ते रविवार (१२ मे) दरम्यान सकाळी ११ ते १२ महाआरती आणि मंदिर प्रदक्षिणा कार्यक्रम होणार आहे. दररोज रात्री ९ ते ११ ढोल-लेझीमच्या साथीने देवीची महाआरती आणि मंदिर प्रदक्षिणा होणार आहे. यानंतर मनोरंजनपर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवारी (१० मे) सायंकाळी ४ ते ५ महिलांसाठी हळदी कुंकु कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी (११ मे) रोजी श्रीरामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट पारसोंङ यांनी सकाळी ९ ते ५ सर्व रोग निदान शिबीर आणि मोफत उपचार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
रविवारी (१२ मे) दुपारी ३ ते ६ होम हवन आणि इतर विधी संपन्न होतील. रात्री ९:३० ते ११ शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचे स्वागत आणि बक्षीस समारंभ होणार आहे. यानंतर रात्री १२ ते ४ श्री वरदायिनी माता तरुण नाट्य मंडळ चिंचणी यांचे ५९ वे नाट्य “तुफान विनोदी नाटक” सादर होणार आहे.
सोमवारी (१३ मे) पहाटे ४:३० ते सकाळी ११ छबिना आणि गावातून पालखी मिरवणूक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ११ ते १ लळीत, लघुरुद्राभिषेक, होम समाप्ती आणि महाआरती होईल. यानंतर महाप्रसादाने यात्रेची सांगता होणार आहे.
सर्व भाविक भक्तांना आई श्री रामवरदायिनी मातेच्या यात्रोत्सवात सहभागी होण्याचे आणि देवीचे आशीर्वाद घेण्याचे आवाहन देवस्थान विश्वस्त व ग्रामस्थ मंङळ पार्वतीपूर पार यांच्याकङून करण्यात आले आहे.