Follow us

Home » ठळक बातम्या » महाबळेश्वरमध्ये अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू

महाबळेश्वरमध्ये अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू

महाबळेश्वरमध्ये अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू

महाबळेश्वर: दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी महाबळेश्वर ते मेढा रस्त्यावर देवी चौकच्या पुढे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव अजय चंद्रकांत कदम असे आहे.

या घटनेची माहिती अशी की, अजय कदम हे रात्री २:३० ते ३:०० च्या दरम्यान आपल्या मोपेडवरून महाबळेश्वरवरून मेढाकडे जात होते. तेव्हा समोरून येणाऱ्या अज्ञात पिकअप वाहनाने त्यांना धडक दिली. यात अजय यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडवून आरोपी वाहनचालक पळून गेला.

या घटनेची माहिती मिळाल्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक इनामदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. फिर्यादी सचिन कदम यांच्या तक्रारीवरून अज्ञात पिकअप वाहनचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ३०४(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपी वाहनचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket