Follow us

Home » ठळक बातम्या » जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे, इयत्ता सातवी निरोप समारंभ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे, इयत्ता सातवी निरोप समारंभ

  1. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे, इयत्ता सातवी निरोप समारंभ

कोरेगाव प्रतिनिधी (अविनाश थोरवे)काल दिनांक 27 मार्च 2024 रोजी जिल्हा परिषद शाळा भोसे येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आयुष्यातील पहिल्या टप्प्यातील पहिला निरोप समारंभ मराठी शाळेमध्ये पार पडला यामध्ये इयत्ता सातवी मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या आयुष्यातील या संस्कारक्षम वयातील त्यांच्यावर इयत्ता पहिली पासून ते इयत्ता सातवी पर्यंत शैक्षणिक आणि सर्वांगीण संस्कार करणाऱ्या शाळेतील इयत्ता सातवी च्या परीक्षेला सामोरे जाण्या अगोदर चा सर्व शिक्षक शाळेतील इतर सर्व विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांना निरोप दिला..

या निरोप समारंभ प्रसंगी शाळेतील इतर वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले, यामध्ये आज पर्यंत या सातवीच्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे दैनंदिन अनुभव सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगता मध्ये व्यक्त केले. त्यानंतर इयत्ता सातवीच्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांनी आजपर्यंत त्यांना ज्ञानदान करणाऱ्या सर्व शिक्षकांबद्दल आणि आजपर्यंतच्या त्यांच्या या शैक्षणिक आयुष्यातील प्रवासाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारे त्यांचे वर्ग शिक्षक तसेच इतर शिक्षकांनी सुद्धा सातवीच्या या बॅच बद्दल आपले अनुभव आपल्या मनोगतामधून व्यक्त केले. मधल्या कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढताना सर्वच शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागली होती, परंतु भोसे सारख्या ग्रामीण भागातील शाळेमध्ये अनेक अडचणींवर मात करून या सर्व शिक्षकांनी मुलांच्या गुणवत्ते बरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास करत असताना या सर्व मुलांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी अचूक मार्गदर्शन करून नवोदय असेल सैनिक स्कूलच्या इतर परीक्षा असतील या परीक्षांसाठी मुलांना उद्युक्त केले. यामधे भोसे शाळेतील नवोदय तसेच सैनिक स्कूल साठी काही विद्यार्थ्यांची निवड झाली हे आपल्या शाळेचे यश शिक्षकांनी कथन केलं, तसेच शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांच्या क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेची क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी जिल्हास्तरावर यश मिळवून दाखवून दिली. अशा पद्धतीने मराठी माध्यमाच्या शाळेकडे पाहण्याचा ग्रामीण भागातील पालकांचा दृष्टिकोन बदलण्यामध्ये यामुळे निश्चितच भविष्यात फायदा होईल, आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांपेक्षाही उत्कृष्ट पद्धतीच ज्ञानदान आणि सर्वच स्पर्धा परीक्षा असतील, शालेय क्रीडा स्पर्धा असतील यामध्ये उत्तुंग यश संपादन केलं याबद्दलही क्रीडाशिक्षक नितीन शिर्के सरांनी आपलं मनोगत व्यक्त केले, इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक बजरंग वाघ सरांनी सुद्धा सातवीच्या या बॅच बद्दल विद्यार्थ्यांच आणि शिक्षकांचे एक वेगळंच नातं निर्माण झालं हे आपल्या शब्दात त्यांनी मांडलं, अनेक विद्यार्थी हे भावनिक झाले होते, आपल्या मनोगतामधून व्यक्त होत असताना काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू आले यामधूनच शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं किती दृढ आहे याची प्रचिती या ठिकाणी आली. इंग्लिश विषयामध्ये आज अनेक विद्यार्थी उत्तम प्रकारे तयार झालेले या ठिकाणी पाहायला मिळाले, अशा पद्धतीने ग्रामीण भागातील ही शाळा असून सुद्धा सर्वच क्षेत्रात यशस्वी घोडदौड करताना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी शाळेमधील विद्यार्थ्यांचा टक्का निश्चित वाढेल अशी आशा निर्माण झालेली या ठिकाणी दिसून आली. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे चे मुख्याध्यापक हकीम सर तसेच अहिरेकर मॅडम, गडकरी मॅडम, सारिका पाटील मॅडम, गौरी माने मॅडम याबरोबरच सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिक्षणप्रेमी पत्रकार अविनाश थोरवे, तसेच शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि आजच्या या निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवणारे लक्ष्मण इंगवले या सर्वांच्या उपस्थितीत हा निरोप समारंभाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी चैत्राली ज्ञानेश्वर माने हिने केले. अशा प्रकारे आभार प्रदर्शन व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket