जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोरखळला कूपर उद्योग समुहाच्यावतीने ‘ग्रंथालय’ भेट.
बोरखळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस कूपर उद्योग समूहाच्यावतीने सामाजिक दायित्व योजने अंतर्गत नुकतेच कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी मा. श्री. नितीन देशपांडे साहेब यांच्या हस्ते ग्रंथसंपदा भेट प्रदान करण्यात आली.
मा. श्री. नितीन देशपांडे साहेब उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करत असताना गावातील न्यु इंग्लिश स्कूल मधील इ.10 वी मध्ये प्रथम कमांक येणारा विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना रु.5,000/- देणार असल्याची घोषणा केली.
सदर कार्यक्रमा प्रसंगी सौ. प्रिया रसाळ सरपंच बोरखळ यांनी आपल्या मनोगतात, “बोरखळ गावाच्या विकासासाठी उद्योगाच्या सामाजिक दायित्व योजने अंतर्गत मदत करणारा कूपर उद्योग समूह हा पहिला उद्योग समूह आहे, ज्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ग्रंथालय भेट देण्यात आली आहे. याचा मुलांच्या शैक्षणिक व बौद्धिक विकासास नक्कीचं मोठा फायदा होईल”, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सर्व ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन कमिटीच्यावतीने मा. श्री. फरोख कूपर साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
सदर उद्घाटन कार्यक्रमास सौ. प्रतिभा रसाळ – उपसरपंच, श्री. जालिंदर रसाळ – तंटामुक्ती अध्यक्ष, श्री. शंकर शिंदे – मुख्याद्यापक (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा), श्री अजित पाटील – अध्यक्ष (माध्यमिक शाळा व्यवस्था कमिटी), श्री. दत्ताञय रसाळ – अध्यक्ष (जि. प. शाळा व्यवस्था कमिटी), शिक्षक- साधना जगदाळे, श्रद्धा जाधव, मिना परामणे, हेमंत इतापे, ग्रामपंचायत सदस्य श्री पोपट शिर्के, श्री. अक्षय पवार, सौ. पुष्पा पवार, श्री. दिपक रसाळ, कूपर उद्योग समूहातील श्री. महेश खरे व गावातील रहिवासी कूपर उद्योग समूहातील कामगार व कर्मचारी तसेच कूपर सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते सर्वश्री अनिकेत रसाळ, संदीप पाटील, अमोल रसाळ, संतोष रसाळ, समीर सय्यद, भगवान रसाळ, विनोद नलवडे, दिपक रसाळ, प्रतीक रसाळ, नारायण दिक्षीत, फिरोज सय्यद, विजय रसाळ, युवराज पवार, किरण पाटील, मोहन दिक्षीत, रमजुद्दीन सय्यद, श्रिकांत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.