Follow us

Home » राज्य » सरपंच,सदस्य हे संगणक साक्षर हवेत

सरपंच,सदस्य हे संगणक साक्षर हवेत

सरपंच,सदस्य हे संगणक साक्षर हवेत

सातारा -प्रतिनिधी:आपल्यापेक्षा विकासात आघाडीवर असलेल्या गावांना भेटी देऊन आपल्या गावाच्या प्रगतीचा लोकसहभागातून विकासात्मक नियोजन केले पाहिजे.ग्रामपंचायत कामकाज सध्या ऑनलाईन झाले असल्याने यापुढे गतिमान, पारदर्शक,निधीचा योग्य विनियोग, वेळेवर कामकाज होईल.सक्षम ग्रामविकास करण्यासाठी आता सरपंच,सदस्यांना संगणक ज्ञान आवश्यक असून त्यांनी जबाबदारी ओळखून सर्वोत्तम योगदान द्यावे,” असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव आणि माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, सातारा पंचायत समिती आणि केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या विद्यमाने जिल्ह्यातील महिला सरपंचांसाठी एक दिवसीय डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांच्या हस्ते आणि सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.बी. एस.सावंत,रयत सायन्स सेंटरचे संचालक डॉ.सारंग भोला,राज्य पंचायत विभागाचे समन्वयक अमर ढाले,प्राचार्य विजय जाधव यांच्या उपस्थितीत झाले.

अमर ढाले यांनी,’ ग्रामपंचायत कामकाजातील डिजिटल बदल आणि त्याबाबत सरपंचांची असणारी जबाबदारी स्पष्ट केली.त्यानंतर या कार्यशाळेत प्रत्येक सरपंचांना स्वतंत्र संगणकावर बसून त्यांना केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनींच्या सहकार्याने ई ग्राम स्वराज्य मधील प्रत्येक फोल्डर ओपन करून त्यात असणाऱ्या

वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग, आराखडा, ऑडिट

नोंदी, ग्रामसभेचे रेकॉर्ड असणारे पंचायत निर्णय, डिजिटल सहीचा वापर कसा करावा, शाश्वत विकासाची ध्येय साध्य करण्यासाठी पंचायत डेव्हलपमेंट इन्डेक्स,खरेदी प्रक्रिया याबाबत वेबसाईटवर ओपन करून त्याची पडताळणी करण्याचे प्रशिक्षण दिले. अशा पध्दतीचे महिला सरपंचांना संगणकावर बसून प्रशिक्षण देणारी राज्यातील पहिली कार्यशाळा असून हाच पंचायत राज प्रशिक्षण केंद्राने सरपंचांना डिजिटल साक्षरतेचा सातारी पॅटर्न सुरू केला असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक प्राचार्य विजय जाधव, स्वागत संचालक डॉ.बी.एस.सावंत तर आभार डॉ.सारंग भोला यांनी मानले.

सरपंच साक्षर नको डिजिटल साक्षर हवा

पुण्याच्या यशदा चे उप महासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या प्रशिक्षण कार्यशाळेला ऑनलाईन मार्गदर्शन करताना,

“ग्रामपंचायतीचे कायदेशीर दृष्ट्या सरपंच हे प्रमुख कार्यकारी अधिकारी असून त्यांना डिजिटल कामकाजाचे परिपूर्ण ज्ञान असायला हवे. गावातील प्रत्येकाचे जीवनमान उंचावण्यासाठी शाश्वत विकासाची ९ ध्येय साध्य करा.यापुढे नियमित गावाच्या प्रगतीचा अहवालतयार होणार असून तो ऑनलाईन पाहिला जाणार आहे.म्हणून प्रत्येक दिवस महत्त्वाचा असणार आहे.त्यामुळे सर्वोत्तम काम करत रहा,”असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

आजचे राशिभविष्य 1 सप्टेंबर 2024

दैनंदिन राशिभविष्य     मेष : तुमची मानसिकता आज सकारात्मक असणार आहे. तुम्हाला तुमच्या विचारांची योग्य दिशा सापडणार आहे. मनोबलाच्या जोरावर

Live Cricket