Follow us

Home » राजकारण » सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ असे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या अनुलोम या सामाजिक संस्थेच्या टीम सोबत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेनीं साधला संवाद

सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ असे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या अनुलोम या सामाजिक संस्थेच्या टीम सोबत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेनीं साधला संवाद

लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अनुलोमचे योगदान- श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

जनसामान्यांना नेमक्या कोणत्या समस्या भेडसावत आहेत आणि त्यांचा कल कुठल्या दिशेने आहे हे उत्सुकतेने जाणून घेणाऱ्या अनुलोम या सामाजिक संस्थेचे योगदान फार मोलाचे आहे. सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ असे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या अनुलोम या सामाजिक संस्थेच्या टीम सोबत उदयनराजे भोसले यांनी  संवाद साधला. 

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील कदम, लोकसभा संयोजक सुनील काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी, माजी नगराध्यक्ष माधवी कदम, धनंजय पाटील, चंद्रकांत पवार यांची उपस्थिती होती.

लोकप्रतिनिधी निवडून देण्यापर्यंत मतदारांची भूमिका संपत नाही. जनतेचा संपूर्ण अंकुश लोकप्रतिनिधींवर असणे गरजेचे आहे. अनुलोम संस्था सत्तेचा विकेंद्रीकरण करण्यामध्ये योगदान देत आहे.

श्री सुनील काटकर म्हणाले, निवडणुकीमध्ये इथून पुढचे आठ ते नऊ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत लोकांची भूमिका मतांमध्ये रूपांतरित करून निर्णय विजयासाठी अनुलोम संस्था प्रयत्न करत आहे, हे योगदान छत्रपती उदयनराजे मित्र समूह कधीही विसरणार नाही.

योजनेचे संयोजक श्री चंद्रकांत पवार म्हणाले पुढील दहा दिवस जिल्ह्यामध्ये विस्तारक योजना राबवली जाणार आहे. अनुलोमची २० जणांची टीम रोज 50 घरांमध्ये जाऊन सरकारने केलेले सकारात्मक काम जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. तीन लाख लोकसंख्येपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket