Follow us

Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाई नगरपालिकेचा अनधिकृत फ्लेक्सवर हातोडा

वाई नगरपालिकेचा अनधिकृत फ्लेक्सवर हातोडा

वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)वाई नगरपालिकेचा अनधिकृत फ्लेक्सवर हातोडा

वाई शहरातील ३९ होर्डिंग्ज, १५ मोबाईल टॉवर्सना बजावल्या नोटीसा

राज्य शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण वाई शहरातील पालिका प्रशासनाने चौका-चौकात लावलेले धोकादायक जाहिरातीचे अनधिकृत फ्लेक्स बोर्डवर बाई नगरपरिषदेच्या वतीने कार्यवाही करण्यात आली आहे. अनाधिकृत ३९ होर्डिंग व १५ मोबाईल टॉवर्सना सुध्दा हटविण्याच्या नोटीसा पाठविण्यात आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई येथील घाटकोपर मधील झालेल्या होर्डिंग्ज दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रस्त्यावर लावलेल्या अनधिकृत फ्लेक्स बोर्डवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रत्येक पालिकेला देण्यात आलेले आहेत.त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने वाई शहरातील पालिकेची

परवानगी न घेता लावलेले व धोकादायक झालेले दहा होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. पालिकेची ही कारवाई अजून दोन दिवस राबविण्यात येणार असून व्यवसायिकांनी आपले जाहिरातीचे फ्लेक्स स्वतःहून काढून घेण्यात यावेत असेही आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे. वाईच्या किसनवीर चौकात, गणपती घाटावर, शिवाजी चौक, वाई एसटी स्टँड परिसरात लावलेल्या जाहिरातीच्या फ्लेक्स बोर्डवर कारवाई करण्यात आली. प्रत्येक चौकात व्यवसायिकांनी लावलेल्या जाहिरातीच्या फ्लेक्स बोर्डमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून वाई शहराला लागलेल्या भल्या मोठ्या फ्लेक्स बोर्डमुळे शहराचे विद्रुपीकरण झाल्याचे निष्पन्न झाले होते. आज मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अशा सर्व व्यवसायिकांच्या होर्डीग्जवर कार्यवाही करणेत आलेली आहे. अतिक्रमण मोहीम अजूनही कडक करणार असून वाई शहरात फक्त आठ ठीकांनी नगरपालिकेच्या वतीने जाहिरातीचे फलक लावण्याची परवानगी आहे. बाकी सर्वच ठिकाणचे होर्डीग्ज हटविण्यात येणार आहेत. अतिक्रमण विभागामार्फत ही कार्यवाही सुरुच ठेवणेत येणार असलेची माहिती मुख्याधिकारी संगीता दळवी व कार्यालयीन अधीक्षक नारायण गोसावी यांनी दिली आहे. या मोहिमेत स्थापत्य अभियंता कोमल साबळे, नवीन कांबळे, कुंडलिक लाखे, उमेश कांबळे, वीरेंद्र कांबळे, रोहित गाढवे, योगेश गाडे, राहुल गाडे, चंद्रकांत अडसूळ, अनिल कांबळे, सागर लाड, परेश लाड, महेश लाड, भूषण चव्हाण या पालिका कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

आजचे राशिभविष्य 1 सप्टेंबर 2024

दैनंदिन राशिभविष्य     मेष : तुमची मानसिकता आज सकारात्मक असणार आहे. तुम्हाला तुमच्या विचारांची योग्य दिशा सापडणार आहे. मनोबलाच्या जोरावर

Live Cricket